1

मुलाखतीला जाताना भडक रंगाचे कपडे घालू नये. फॉर्मल कपडे घालून मुलाखतीला जावे.

2

तसेच मुलाखतीला जाताना भडक रंगाचा मेकअप टाळावा.

3

कामाचे स्वरूप आणि पगाराची अपेक्षा याबाबत एक निश्चित उत्तर असाव.

4

मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अगदी स्पष्टपणे द्यावी.

5

मुलाखतीला आत्मविश्वासाने सामोरे जावे.

6

आपण ज्या कंपनीमध्ये मुलाखत द्यायला जाणार आहोत त्या कंपनीची संपूर्ण माहिती नीट जाणून घ्यावी.

7

मुलाखतीच्या दरम्यान आपल्या देहबोलीकडे ही लक्ष द्यावे.

8

मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीचे लक्षपूर्वक ऐकावे, पुढे त्या संबंधित प्रश्न विचारले जाऊ शकतात.

9

मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीशी नजर चोरून बोलू नये.

10

सर्वात महत्त्वाचे मुलाखतीच्या ठिकाणी वेळेवर हजर राहणे.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.