आज 25 सप्टेंबर, रविवार हा पितृ पक्षाचा (Pitru Paksh) शेवटचा दिवस आहे. त्याला सर्वपित्री अमावस्या 2022 असे म्हणतात.



या दिवशी पितरांचे श्राद्ध, तर्पण वगैरे केल्याने त्यांना मोक्ष प्राप्त होतो, असे धार्मिक ग्रंथात लिहिले आहे.



ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी पूर्वज आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात. या दिवशी काही कामं चुकूनही करू नये, नाहीतर पितरांना राग येऊ शकतो.



सर्वपित्री अमावस्येला केस कापू नका किंवा मुंडण करू नका. तसेच या दिवशी नखे कापू नयेत.



सर्वपित्री अमावस्येला लसूण-कांदा इत्यादी तामसिक गोष्टी खाऊ नयेत. याशिवाय हरभरा, काळे उडीद, काळे मीठ, मोहरी इत्यादी खाऊ नयेत.



वायु पुराणानुसार श्राद्ध पक्षात मांस आणि मद्य सेवन टाळावे अन्यथा पितरांना राग येतो. अमावस्या तिथीला या गोष्टी विशेष लक्षात ठेवाव्यात.



श्राद्ध पक्षातील अमावस्येच्या दिवशी शरीरावर तेल मालिश करू नये. यामुळे मनात अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे.



धार्मिक ग्रंथानुसार श्राद्ध पक्षातील अमावास्या खूप खास असते. या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे.



नियमानुसार लोखंडी आसनावर बसून श्राद्ध करू नये. रेशीम, घोंगडी, लाकूड, कुशा इत्यादींनी केलेली आसने उत्तम आहेत.



या दिवशी एखादी व्यक्ती अन्नाच्या अपेक्षेने तुमच्या घरी आले तर त्याला रिकाम्या हाताने परत करू नका.



सर्व पितृ अमावस्येला कोणत्याही गरीब किंवा असहाय व्यक्तीची चेष्टा करू नका.