धार्मिक ग्रंथानुसार नवरात्रीचे (Navratri 2022) नऊ दिवस शुभ मानले जातात.



जे लोक लग्नासाठी वधू किंवा वर पाहण्याची योजना आखत आहेत, त्यांनी हे जाणून घेणं गरजेचं आहे. 



नवरात्रीच्या नऊ तिथी अशा आहेत, ज्यामध्ये कोणतेही शुभ कार्य मुहूर्त न पाहताही करता येतात.



तुम्ही वधू किंवा वर पाहण्यासाठी जाणार असाल, ते या शारदीय नवरात्रीच्या शुभ मुहूर्ताचा लाभ घेऊ शकतात.



धार्मिक ग्रंथांनुसार, नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच प्रतिपदा सोडली तर तुम्ही मुलीला किंवा वराला भेटण्यासाठी जाऊ शकता आणि त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित करू शकता



वधू-वरांना भेटायला जाताना भद्रा, दिशाशूळ यांची जरूर काळजी घ्यावी. धार्मिक मान्यतांनुसार, या काळा दरम्यान कोणत्याही शुभ कार्यासाठी घराबाहेर पडू नये.



नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथी वधू किंवा वर पाहण्यासाठी सर्वोत्तम आहेत.



याशिवाय, नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर लोक कोणताही नवीन व्यवसाय सुरू करतात किंवा त्यांच्या नवीन घरात प्रवेश करतात.



शारदीय नवरात्र हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण असल्याचे ज्योतिषशास्त्रात सांगतात.



हा दिवस देवी दुर्गाच्या शक्तीचे प्रतिक मानला जातो.