प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं निधन झालं.



संतूर वाद्याला संगीत विश्वात वेगळी ओळख निर्माण करुन देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.



पंडित शिवकुमार शर्मा हे उत्तम गायक म्हणूनही प्रसिद्ध होते.



1956 साली त्यांनी व्ही. शांताराम यांच्या 'झनक झनक पायल बाजे' या गाण्याला संगीत दिलं होतं.



हरिप्रसाद चौरसिया यांच्या साथीनं त्यांनी काही चित्रपटांना संगीतसुद्धा दिलं.



पंडित शिवकुमार शर्मा यांना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत.



डित शिवकुमार शर्मा यांना सन 1986 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला



1991 साली पद्मश्री, 2001 मध्ये पद्म विभूषण या सन्मानाने पंडितजींना सन्मानित करण्यात आलं



पंडित शिवकुमार शर्मा यांच्या जाण्यानं संगीत विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.