नुकताच KGF 2 चा ट्रेलर रिलीज झाला असून यामध्ये संजय दत्त अधीराच्या भूमिकेत दिसत आहे. KGF 2 मध्ये तो अतिशय भयानक अवतारात दिसणार आहे. हा भीतीदायक अवतार दिसण्यासाठी संजय दत्तचे 25 किलोचे चिलखत परिधान करून शूटिंग सुरू आहे. KGF 2 चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून संजय दत्तची लांब टोपी, लाल डोळे आणि लोखंडी चिलखत याबद्दल चर्चा सुरू आहे. केजीएफ टू मध्ये संजय दत्तला कास्ट करण्याचे काम स्टायलिश नवीन शेट्टीने केले आहे. अधीरा म्हणजेच खलनायकाच्या लूकमध्ये आणण्यासाठी खूप मेहनत घेण्यात आली आहे. लांब टोपी, लाल डोळे आणि अंगभर टॅटू असलेले 25 किलोचे चिलखत घालून संजय दत्तला शूटिंग करावी लागत आहे. केजीएफ टू हा चित्रपट 14 एप्रिल रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.