समंथा रुथ प्रभू ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
सध्या समंथा ही एका आजाराचा सामना करत आहे, अशी चर्चा सुरु आहे.
उपचार घेण्यासाठी ती परदेशात गेली आहे, असंही म्हटलं जात आहे. समंथा उपचारासाठी परदेशात गेल्यानं तिच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग देखील थांबवण्यात आलं आहे.
समंथा ही 'पॉलीमॉर्फ्स लाइट इरप्शन' (Polymorphous Light Eruption) या आजाराचा सामना करत आहे, असं म्हटलं जात आहे.
'पॉलीमॉर्फ्स लाइट इरप्शन' या आजारावर उपचार घेण्यात समंथा ही अमेरिकेमध्ये गेली आहे, अशी चर्चा सुरु आहे.
समंथानं अजून तिच्या आजाराबाबत अधिकृतपणे माहिती दिलेली नाही.
समंथा तिच्या खुशी या आगामी चित्रपटाचं शूटिंग करत होती पण या उपचारासाठी ती परदेशात गेल्यामुळे आता या चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे, असंही म्हटलं जात आहे.
समंथा लवकरच यशोदा या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
'यशोदा' हा सायन्स फिक्शन-थ्रिलर सिनेमा आहे.
समंथाच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.