बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणारा अभिनेता सलमान खान हा त्याच्या स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकतो.
सलमान हा त्याच्या चित्रपटांबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो.
सलमान खानने नुकत्याच एका पत्रकार परिषदेला हजेरी लावली होती.
पत्रकार परिषदेमध्ये सलमानला नव्या कलाकारांबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आला.
नव्या कलाकारांबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नाला सलमाननं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
सलमान खानला नव्या कलाकारांबद्दल विचारण्यात आलं. यावेळी तो म्हणाला, 'ते सर्व मेहनत करत आहेत. प्रत्येकजण खूप लक्ष केंद्रित करुन काम करत आहेत. पण आम्ही पाच जण इतक्या सहजासहजी माघार घेणार नाही. '
पुढे सलमान म्हणाला, 'आता पाच जण कोण आहोत? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचं उत्तर शाहरुख, आमिर, मी, अक्की (अक्षय कुमार) आणि अजय असे आहे. आम्ही लवकर रिटायर्ड होणार नाही.'
सलमान खानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने बघत आहेत.
'किसी का भाई किसी की जान' आणि 'टायगर 3' या चित्रपटांमधून सलमान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
सलमान हा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आगामी चित्रपटांची माहिती प्रेक्षकांना देतो.