अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा 'टायगर 3' (Tiger 3) हा चित्रपट उद्या रिलीज होत आहे.



सलमान खानचा हा स्पाय थ्रिलर चित्रपट दिवाळीच्या खास मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.



'टायगर 3' हा चित्रपट रिलीज होण्याआधी सलमाननं नुकतेच ट्वीट शेअर केलं आहे.



सलमाननं ट्वीटमध्ये लिहिलं, आम्ही टायगर 3 हा चित्रपट खूप उत्कटतेने बनवला आहे. जेव्हा तुम्ही चित्रपट पहाल तेव्हा स्पॉयलरबाबत आम्ही तुमच्यावर अवलंबून आहोत.



स्पॉयलर चित्रपट पाहण्याचा अनुभव खराब करू शकतात. तुम्हाला चित्रपट बघताना तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही कराल यावर आम्हाला विश्वास आहे.., असंही सलमाननं ट्वीटमध्ये लिहिलं,



'एक था टायगर', 'टायगर जिंदा है', 'वार' आणि 'पठाण' या चित्रपटानंतर आता YRF च्या स्पाय युनिव्हर्समधील 'टायगर 3' हा पाचवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.



प्रेक्षक सलमानच्या आगामी चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघतात.



आता सलमानचा टायगर-3 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कलेक्शन करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.



सलमानच्या टायगर जिंदा है आणि एक था टायगर या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.



सलमान त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो.