लांबलचक वेणीमध्ये सईचं फोटोशूट, फोटो व्हायरल! सईच्या बोल्ड आणि बिंधास्त लूकची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगत असते. एकांकिका आणि व्यवसायिक रंगभूमीवर अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर सईने मालिकांमध्ये लहान-लहान भूमिका करत करिअरची सुरुवात केली होती. सई ताम्हणकरला 'या गोजिरवाण्या घरात' या मालिकेमुळे खरी ओळख मिळाली. सई आपले क्लासी आणि हटके फोटो नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते. सईचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. सईने नुकतेच ग्लॅमरस ड्रेस मध्ये तिचे फोटो शेअर केलेत, या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय.