दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी आता बॉलिवूडमध्ये झळकण्यासाठी सज्ज आहे. साई पल्लवी अल्लू अरविंदचा 'रामायण' या सिनेमाचा भाग आहे. साई पल्लवी 'रामायण' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'रामायण' हा पौराणिक सिनेमा असून या सिनेमात साई सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. साईचा 'रामायण' हा सिनेमा 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'रामायण'मध्ये साईला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. साई पल्लवीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवल्यानंतर साई आता बॉलिवूड गाजवायला सज्ज झाली आहे. साईने अद्याप बॉलिवूड पदार्पणासंदर्भात भाष्य केलेलं नाही. साईच्या आगामी सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.