सईचा ग्लॅमरस अंदाज वेधतोय चाहत्यांचे लक्ष! मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. सई तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकसोबतच दर्जेदार अभिनयासाठीही ओळखली जाते. नुकतेच सईने तिच्या एका ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सईनं मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या नावाचा ठसा उमटवला या फोटोमध्ये सईने ग्रे रंगाची नेटची साडी परिधान केलीये ज्यात ती खूपच क्लासी दिसतेय. सईच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.