महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर अलीकडे सोशल मीडियावर बराच अॅक्टिव्ह असतो. सचिन विविध पोस्ट शेअर करत असतो. या सर्वात तो विविध पदार्थ तयार करतानाचे व्हिडीओ तयार करत असतो. आता त्याने पिझ्झा तयार करतानाचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. त्याने या पोस्टमध्ये स्वत:चा पिझ्झा तयार करतानाचा फोटो तसंच व्हिडीओही शेअर केला आहे. या सर्व पोस्टला सचिनने खास कॅप्शन देत पिझ्झा कसा कापता हे महत्त्वाचं नाही पण तो मित्रांसोबत शेअर करणं खास आहे. बार्बेक्यू पद्धतीने हा पिझ्झा सचिनने तयार केला आहे. सचिन इतरही पदार्थ तयार करतानाच्या पोस्ट शेअर करत असतो. सचिन मुंबई इंडियन्स संघासोबत युवा खेळाडूंना खास टीप्स देण्यासाठी मागील काही काळ होता. अनेकदा तो फॅमिलीसोबतचे फोटोही शेअर करत असतो.