गंगूबाई काठियावाडी शुक्रवारी (25 फेब्रुवारी) प्रदर्शित झाला. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली. रिपोर्टनुसार, गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचं पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 9.50-10 कोटी रूपये आहे. डिसेंबरमध्ये रिलीज झालेल्या रणवीर सिंहच्या 83 या चित्रपटापेक्षा गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. आलियासोबत शांतनु महेश्वरी आणि अजय देवगण यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटातील ढोलिडा,झूमे रे गोरी, मेरी जान आणि जब सैय्या या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आलिया भट्टचा 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा बायोग्राफिकल ड्रामा आहे.