मराठी मनोरंजन विश्वच नव्हे तर, बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते.



अभिनयाव्यतिरिक्त सई ताम्हणकर तिच्या फॅशनमुळे देखील नेहमीच चर्चेत असते.



अभिनेत्री दररोज आपले नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.



नुकतेच सई ताम्हणकरने तिचे नवे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.



या फोटोमध्ये तिचा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.



या फोटोंमध्ये सई ताम्हणकरने शॉर्ट स्कर्ट आणि जॅकेट परिधान केले आहे.



गळ्यात सुंदर गोल्ड चेन आणि केसांची पोनी, अभिनेत्रीचा लूक खूप सुंदर दिसत आहे.



सई ताम्हणकरने तिचे नवे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.



सईच्या या फोटोशूटवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे. कमेंट करत अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.