मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपले फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या फोटोंची चर्चा चाहत्यांमध्ये नेहमीच रंगल्याचं पाहायला मिळतं. प्राजक्ता तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करते. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ असो वा कोणताही चित्रपट, प्राजक्ताचा साडी लूक नेहमीच चाहत्यांना घायाळ करतो. प्राजक्ताच्या ट्रेडिशनल लूकला नेटकऱ्यांची विशेष पसंती मिळते. अभिनेत्री प्राजक्ता माळीनं तिच्या मराठमोळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लाल रंगाची साडी, केसांचा आंबाडा आणि गोल्ड ज्वेलरी अशा लूकमधील फोटो प्राजक्तानं शेअर केले.