पृथ्वीचा 71 टक्के भाग हा पाण्याने झाकला आहे, आणि यातील खूप कमी टक्के पाणी पिण्यालायक आहे. ( Image Credit- Unsplash )



पृष्ठभागावरील 97 टक्के पाणी समुद्रात आणि महासागरांत आहे जे खारट आणि पिण्यायोग्य नाही. ( Image Credit- Unsplash )



तुम्ही कधी विचार केला आहे का समुद्राचं पाणी खारट आणि नदीचं पाणी गोड का असतं. ( Image Credit- Unsplash )



नद्या आणि झऱ्यांमध्ये पावसाचं पाणी येतं, या पाण्यात निसर्गातील क्षार आणि बाकी काही पदार्थ विरघळतात . ( Image Credit- Unsplash )



नद्यांचं पाणी गोड असतं कारण नदीत क्षाराचं प्रमाण कमी असतं. यामुळे नदी आणि झऱ्यांचं पाणी गोड लागतं. ( Image Credit- Unsplash )



नद्यांचं पाणी पुढे समुद्राला जाऊन मिळते त्यातील सर्व क्षार समुद्रात मिसळतात, यात सोडियम क्लोराईड हे क्षार देखील असतात ज्यापासून मीठ तयार केलं जातं, या मुळे समुद्राचं पाणी खारट बनतं. ( Image Credit- Unsplash )



सोडियम क्लोराईड विरघळण्यास अनेक वर्षे लागतात आणि ते तिथेचं राहते म्हणून समुद्राचं पाणी आपल्याला खारट लागतं. ( Image Credit- Unsplash )