इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू बेन स्टोक्स एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त



त्याने त्याच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन एक भावूक पोस्ट लिहित ही माहिती दिली आहे.



बेनने एक अत्यंत भावूक पोस्ट लिहित निवृत्ती जाहीर केली असून यावेळी त्याने



इंग्लंडचा एकदिवसीय संघाचा सध्याचा कर्णधार जोस बटलरसह संपूर्ण इंग्लंड क्रिकेटचे आभार मानत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.



स्टोक्स हा इंग्लंड क्रिकेटमधील एक सर्वात महान अष्टपैलू क्रिकेटर म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.



संघाला विश्वचषक जिंकवून देण्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या स्टोक्सने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.



काय म्हणाला स्टोक्स?

'मी इंग्लंडसाठी अखेरचा एकदिवसीय सामना मंगळवारी डरहममध्ये खेळणार असून



त्यानंतर ही या प्रकारातून निवृत्ती घेणार आहे. हा निर्णय घेणं माझ्यासाठी खूप अवघड होतं.



मी इंग्लंडसाठी माझ्या सहकाऱ्यांसोबत खेळलेला प्रत्येक मिनिट मला खूप जवळ आहे. हा एक सुंदर प्रवास होता.