आज आपल्या देशाचा ७३ वा प्रजासत्ताक दिन आहे. आज राजपथावर देशातील प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे चित्ररथ सहभागी झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ देखील सहभागी झाला आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथातून जैवविविधतेचे दर्शन झाले. हा चित्ररथ जैवविविधता मानके विषयावर आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथामध्ये आपल्याला महाराष्ट्राचा राज्यप्राणी 'शेकरू' 'ब्ल्यू मॉरमॉन' फुलपाखरू, मोर तसेच विवीध अभयारण्यातील दुर्मिळ होत असलेल्या वनस्पती व प्राण्यांच्या प्रजाती अशी जैवविविधता दाखवणारा चित्ररथ आपल्याला राजपथावर होणाऱ्या संचलनात पाहायला मिळाला. या चित्ररथाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देखील दिला आहे. भारत हा देश जैवविविधता संपन्न असून महाराष्ट्रातील चार प्रमुख भागांमध्ये जैवविविधता दिसून येते. युनेस्कोने मान्यता दिलेल्या सूचीमध्ये महाराष्ट्रातील कास पठारचा समावेश आहे.