अनेकांना दीपीका आणि रणवीरच्या लव्ह स्टोरीबाबत माहित नसेल. जाणून घेऊयात दीपिका आणि रणवीरच्या पहिल्या भेटीबाबत... दीपिकानं एका मुलाखतीमध्ये तिच्या आणि रणवीरच्या लव्ह स्टोरीबाबत सांगितले होते. दीपिकानं सांगितलं की, रणवीर आणि तिची पहिली भेट ही सिंगापूरमध्ये एका पुरस्कार सोहळ्यात झाली. पुढे तिने सांगितले, 'मी यशराजच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आणि रणवीर तिथे उपस्थित होता. त्यावेळी तो माझ्यासोबत खूप फ्लर्ट करत होता.' दीपिकाने सांगितले की, त्यावेळी तो दुसऱ्या कोणाला तरी डेट करत होता. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची लव्ह स्टोरी रामलिला चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यापूर्वीच सुरू झाली होती. काही दिवसांपूर्वी रणवीर आणि दीपिकाचा 83 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला.