चेहऱ्याच्या मेकअप प्रमाणेच नखांचा मेकओव्हर देखील महिला करतात.
काही महिला मेनिक्युअर करतात. कारण त्यामुळे नखे अधिक सुंदर, लांब दिसतात.
नेलपॉलिश लावलेली नखं हात आणि पायांचे सौंदर्य वाढवतात. अनेक जण ड्रेसला मॅच करणारी नेलपॉलिश लावतात.
अनेक वेळा नेलपॉलिश काठण्यासाठी नेलपेंट रिमूव्हरचा वापर केला जातो. पण या नेलपेंट रिमूव्हरच्या वासाचा त्रास काही लोकांना होतो.
नेलपेंट रिमूव्हरचा वापर न करता नेलपॉलिश काढायची असेल तर या घरगुती टिप्स फॉलो करा.
परफ्यूम हे नेलपॉलिश रिमूव्हर सारखं काम करते. थोड्याशा कापसात परफ्यूम लावून नखांवर चोळा. नेलपॉलिश काही वेळात निघून जाईल.
तुमच्या अल्कोहोल असेल तर ती कापसात घेऊन नखांवर हलक्या हाताने चोळा. असे केल्याने नेलपेंट सहज निघून जाईल.
टूथपेस्टमध्ये असलेले इथाइल एसीटेट काही मिनिटांत नेलपेंट काढून टाकते.
नेलपॉलिश रिमूव्हरमध्ये देखील इथाइल एसीटेटचा वापर केला जातो.व्हिनेगरमध्ये अॅसिड असते. ते वापरण्यासाठी त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका आणि नंतर कापसाच्या मदतीने नखांवर लावा, यामुळे नेलपॉलिश निघून जाते.