बहुतेक जणांना केस धुतल्यांनतर केसांना टॉवेल गुंडाळण्याची सवय असते. तुमची ही चूक नुकसानदायक ठरू शकते.
केस धुतल्यानंतर केसांना लगेचच टॉवेल गुंडाळून ठेवतात, यामुळे केस सुकतात आणि केसांमधील पाणीही अंगावर गळत नाही. पण ही सवय खूप नुकसानदायक आहे.
यामुळे तुमच्या केसांना नुकसान पोहोचतं. ओल्या केसांना टॉवेल गुंडाणळ्याच्या सवयीचे दुष्परिणाम जाणून घ्या.
ओल्या केसांना टॉवेल गुंडाळू नका. आंघोळीनंतर ओल्या केसांना टॉवेल गुंडाळल्याने केस खराब होतात. यामुळे तुमचे केस कमकुवत होऊन केस गळती होते.
केस ओले असताना फार नाजूक असतात. अशावेळी केसांना टॉवेल गुंडाळल्याने केसांचं टॉवेलसोबत घर्षण होतं. यामुळे केस तुटतात. त्याशिवाय यामुळे केसांची चमकही कमी होते.
आंघोळीनंतर डोक्यावर टॉवेल गुंडाळल्याने केस टॉवेलसोबत घासले जातात. यामुळे केस रुक्ष किंवा कोरडे होऊ शकतात.
जास्त वेळ केसांना टॉवेल बांधून ठेवल्यास केसांमधील नैसर्गिक तेल निघून जातं. त्यामुळे केस खूप कोरडे होतात.
केसांची काळजी घ्यायची असेल. तर केस धुणे आणि केस सुकवण्याच्या सवयींमध्ये बदल करण्याची गरज आहे.