रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट जैसे थे, आरबीआयच्या पतधोरणाची घोषणा 

रेपो रेट 4  टक्के तर रिव्हर्स रेपो रेट 3.5 टक्क्यांवरच, कोणताही बदल नाही 

सुरु आर्थिक वर्षात जीडीपी 7.2 टक्के राहण्याचा अंदाज

2023 सालासाठीचा अंदाजित जीडीपी 7.8 टक्क्यांवरून 7.2 टक्क्यांवर घसरला, आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे वक्तव्य

येत्या काही दिवसात महागाईची झळ बसण्याचा अंदाज, महागाई दर 5.7 टक्के राहण्याची शक्यता 

महागाई दर 4.5 टक्क्यांवरुन वाढून 5.7 टक्के राहण्याचा अंदाज, एप्रिल-जूनमध्ये किरकोळ महागाई दर 6.3 टक्के राहण्याचा अंदाज 

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कच्च्या तेलाच्या किंमती अंदाजे सरासरी 100 डॉलर प्रति बॅरल राहण्याचा अंदाज 

कोव्हिड, युक्रेन-रशिया युद्ध आणि ह्या सर्वांमुळे तयार झालेल्या अस्थिरतेमुळे येत्या काळात भारताला महागाईची झळ पोहोचणार