संत रविदास.. पंधराव्या शतकातलं पंजाबमधल्या संत परंपरेतलं एक नाव. रविदासांनी ज्या विचारांचा प्रसार केला. त्याला मानणारा समाज आज रविदासिया समाज म्हणून ओळखला जातो. या पंथाला मानणाऱ्या समुदायाची संख्या पंजाबमध्ये 50 लाखांपेक्षा अधिक आहे. संत रविदास यांची जयंती 16 फेब्रुवारीला वाराणसीमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. डेरा सचखंड बल्लान हे पंजाबमधलं रविदासिया संप्रदायाचं सर्वात मोठं केंद्र रविदासांची अमृत वाणी रविदासिया समुदायाचा ग्रंथ व्हिएन्नामध्ये झालेल्या हत्येनंतर रविदासिया संप्रदाय वेगळा झाला. शिखांचा पवित्र ग्रंथ गुरू ग्रंथ साहिबच्या ऐवजी रविदासांची अमृत वाणी हा रविदासिया समुदायाचा ग्रंथ बनला.