नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.



रश्मिकाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.



लवकरच रश्मिकाचा 'द गर्लफ्रेंड' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



'द गर्लफ्रेंड' या चित्रपटामधील रश्मिकाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.



रश्मिकानं नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.



व्हिडीओमध्ये रश्मिका ही पाण्याच्या आत दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला ती स्माईल करताना दिसत आहे तर व्हिडीओच्या शेवटी रश्मिकाच्या चेहऱ्यावर गंभीर हावभाव दिसत आहेत.



रश्मिकानं व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, जग महान प्रेम कथांनी भरलेले आहे. पण अशा काही प्रेमकथा आहेत ज्या यापूर्वी कधीही ऐकल्या नाहीत किंवा पाहिल्या नाहीत आणि ‘द गर्लफ्रेंड’ ही अशीच एक आहे.



'द गर्लफ्रेंड' हा रश्मिकाचा 24 वा चित्रपट आहे.



‘चलो’, ‘किरिक पार्टी’, ‘डिअर कॉम्रेड’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘पुष्पा: द राइज’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर आता रश्मिका ही 'द गर्लफ्रेंड' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



'द गर्लफ्रेंड' या चित्रपटासोबतच रश्मिकाचा अॅनिमल हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे