लग्नाबाबत नॅशनल क्रश रश्मिका मंदाना म्हणाली.. नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिचा 'पुष्पा- द राइज' हा चित्रपट प्रदर्शित झाला. सध्या सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू आहे की रश्मिका प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडाला डेट करत आहे. रिपोर्टनुसार, रश्मिका आणि विजय हे मुंबईमधील आणि हैद्राबादमधील एकाच जिममध्ये जातात. तसेच यावर्षीचे न्यूईअर सेलिब्रेशन देखील त्यांनी एकत्र केलं. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये रश्मिकाला, 'ती लग्न कधी करणार?', असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला तिनं उत्तर दिलं, 'मी अजून याबाबत कोणताही विचार केला नाही. माझ वय लहान आहे. मला असा पार्टनर पाहिजे ज्यासोबत मला कम्फर्टेबल वाटेल. '