साऊथची सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना आज तिचा 26 वा वाढदिवस साजरा करत आहे.

रश्मिका लवकरच दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलापतीच्या आगामी सिनेमात दिसणार आहे.

रश्मिकाच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी या सिनेमाची घोषणा केली आहे.

रश्मिका मंदाना लवकरच विजय थलापतीसोबत आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

सिनेमात रश्मिका विजय थलापतीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

सिनेमाची घोषणा करत निर्मात्यांनी रश्मिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छादेखील दिल्या आहेत.

सिनेमात रश्मिका आफ्रीन नामक काश्मिरी मुस्लीम तरुणीची भूमिका साकारत आहे.

हा सिनेमा तेलुगू, तामिळ आणि मल्याळम अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.