अभिनेत्री मलायका आरोराला भेटून परत जात असताना अभिनेत्री करीना कपूर कारच्या कारला छोटासा अपघात झाला आहे.

करीना कपूरच्या गाडीचा अपघात झाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

करीनाची कार पापाराजीच्या (फोटोग्राफर) पायावरून गेल्याचे दिसत आहे.

यावेळी करीना चांगलीच भडकलेलीही व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

करीनाच्या कारचा हा अपघात मलायकाच्या घरासमोर झाल्याची माहिती मिळत आहे.

मलायकाची भेट घेवून करीना बाहेर येत असताना तिचा चालक कार मागे घेत होता. यावेळी पापाराजींची कारभोवती एकच गर्दी झाली.

पापाराजींनी करीनाच्या कारला चारी बाजूंनी घेरले असतानाच एका पापाराजीचा पाय कारखाली गेल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

या घटनेकडे करीनाचे लक्ष जाताच ती जोर जोरात ओरडत कारकडे धाव घेत चालकाला कार पाठीमागे घेण्याची सूचना देते.