बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी 'तू झूठी मैं मक्कार' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. गेल्या काही दिवसांपासून सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये रणबीर कपूर झळकणार असल्याची चर्चा आहे. आता 'तू झूठी मैं मक्कार' या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान रणबीर म्हणाला,सौरव गांगुलीच्या बायोपिकसाठी मला विचारणा झालेली नाही. किशोर कुमार यांच्या बायोपिकमध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. गेल्या 11 वर्षांपासून रणबीर या सिनेमावर काम करत आहे. रणबीर म्हणाला की,माझी दुसरी बायोपिक सौरव गांगुली यांची असू शकते. पण अद्याप यासंदर्भात मला विचारणा झालेली नाही. रणबीर कपूरचा 'तू झूठी मैं मक्कार' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणबीरचा 'तू झूठी मैं मक्कार' हा सिनेमा 8 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणबीरचा 'अॅनिमल' हा सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणबीर कपूरला किशोर कुमार यांच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.