जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे.



देहूतील संत तुकाराम महाराजांचं हे मुख्य मंदिर आहे.



या पालखीचं यंदाचं हे 337 वे वर्ष आहे.



गेली दोन वर्ष कोरोनामुळे या वारकऱ्यांना ना देहूत, ना विठूरायाच्या पंढरीत जाता आलं.



पालखी दरम्यान वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.



दुपारी पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडला.



आता पालखीचा मार्ग आकुर्डी, पुणे, लोणी मार्गे, बारामती इथून असणार आहे.



देहू नगरीतलं आजचं हे नयनरम्य वातावरण आणि वारकऱ्यांचा उत्साह पाहण्यासारखा आहे.