अभिनेत्री एरिका फर्नांडिस म्हणजेच छोट्या पडद्यावरील 'प्रेरणा'. एरिका फर्नांडिस 'कसौटी जिंदगी की' मालिकेतील 'प्रेरणा' या भूमिकेमुळे प्रसिद्ध झाली. एरिकाने नवं फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केलं आहेत. यामध्ये एरिकाचा हटके अंदाज पाहायला मिळाला आहे. डार्क ग्रीन कलरच्या लेहेंग्यामध्ये एरिकाचा काहीसा वेगळा अवतार पाहायला मिळाला आहे. एरिकाने या लेंहेंग्यासोबतची ओढणी डोक्याला बांधत वेगळा लूक केला आहे. यासोबत हेवी हेड ज्वेलरी, बाजू बंद आणि इअररिंग्समुळे एरिकाचा हा अंदाज पाहायला मिळाला आहे. या लूकला एरिकाने उत्तमरित्या कॅरी केलं आहे. एरिका फर्नांडिस सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत प्रत्येक अपडेट शेअर करते. अभिनेत्री होण्याआधी एरिका एक मॉडेल आहे. एरिका फर्नांडिसने अनेक ब्युटी पेजंटमध्ये भाग घेतला आहे. एरिकाने दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे.