देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा घटली आहे.



केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच रविवारी दिवसभरात 5 हजार 910 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.



त्याच्या आदल्या दिवशी शनिवारी 6 हजार 809 कोरोना रुग्ण आढळले होते. त्यामुळे रविवारी तुलनेनं रुग्णांची संख्या 899 ने घसरली आहे.



सणासुदीच्या पार्श्वभूमीवर देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा घट झाल्याची बाब दिलासादायक आहे.



याआधी 31 ऑगस्ट 2022 रोजी कोरोनाबाधितांची संख्या पाच हजारांवर पोहोचली होती. तेव्हा 5 हजार 439 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती.



देशात गेल्या 24 तासांत 7 हजार 34 रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत.



देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण जास्त आहे.



देशातील उपचाराधीन असलेल्या कोरोना रुग्णांची संख्याही घटली आहे.



सध्या देशात 53 हजार 974 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.



भारतात आतापर्यंत एकूण 5 लाख 28 हजार 7 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.



आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सध्या आठ हजार 364 सक्रीय रुग्ण आहेत.



यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक 2949 सक्रीय रुग्ण आहेत.