यंदाच्या विश्वचषकासोबतच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळही संपुष्टात आला आहे.

विश्वचषकाचा अंतिम सामना हा राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळातील शेवटचा सामना होता.

अशा परिस्थितीत राहुल द्रविड भविष्यात टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदी कायम राहणार की नाही?

याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पण, मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल द्रविड स्वतः टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहण्यास इच्छुक नसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

राहुल द्रविड यांनी गेली 20 वर्ष भारतीय क्रिकेट संघासोबत एक खेळाडू, कर्णधार आणि प्रशिक्षक म्हणून प्रवास केला आहे.

पण आता त्यांना आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे.

तसेच तो भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षकपदी कायम राहिल्यास, हे शक्य होणार नाही.

त्यामुळे राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहण्यास इच्छुक नाहीत.

अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.