नुकतंच राधाने काळ्या रंगाच्या साडीत एक सुंदर फोटोशूट केलं आहे. साडीत राधा अतिशय सुंदर दिसतेय. साडीत फोटोशूट करताना राधाने त्यावर साजेसा असा मेकअप देखील केला आहे. राधा मुळची पुण्याची आहे. तिने अभिनव कला महाविद्यालयातून कमर्शिअल आर्ट्सचा अभ्यासक्रम पूर्ण केला. आतापर्यंत राधाने अनेक मालिका, चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. राधाने ‘बावरा दिल’ आणि ‘यह रिश्ता क्या कहलाता हैं’ या हिंदी मालिकांत सुद्धा भूमिका केल्या. राधाने ‘अस्मिता’ ,’कन्यादान’ ,चाहूल, आई कुठे काय करते, आणि सुंदरा मनामध्ये भरली या मालिकांत काम केलं आहे. घाशीराम कोतवाल, आई रिटायर होतेय या नाटकात सुद्धा तसेच ‘चॅलेंज’ या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरील नाटकात देखील तिची भूमिका होती. राधाने बॉलिवूड चित्रपटात देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'मलाल' चित्रपटात ती दिसली होती. राधाचा हा लूक सोशल मीडियावर चाहत्यांना अतिशय आवडतोय.