दाक्षिणात्य अभिनेत्री अमाला पॉल सध्या चर्चेत आहे.

धार्मिक भेदभावामुळे तिला केरळमधील मंदिरात प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप अमालानं केलाय

केरळच्या एर्नाकुलममधील तिरुवैरानिकुलम महादेव मंदिरात अमालाला प्रवेश करण्यापासून मंदिरामधील अधिकाऱ्यांनी रोखल्याचं तिचं म्हणणं आहे.

अमाला पॉल ही सोमवारी मंदिरात दर्शनासाठी गेली होती.

मंदिराच्या आवारात फक्त हिंदूंनाच परवानगी असल्याचं सांगत तिला दर्शन घेण्यापासून रोखलं

मंदिरात प्रवेश नाकारल्यामुळे मंदिरासमोरील रस्त्यावरुनच दर्शन घ्यावं लागल्याचंही अमाला सांगते

अमालानं तिच्या अनुभवाबद्दल मंदिराच्या विजिटर्स रजिस्टरमध्ये लिहिल्याचंही सांगितलंय.

मी देवाजवळ जाऊ शकले नाही पण दूरुनही देव माझ्याजवळच असल्याचं जाणवलं, असं अमाला म्हणते

मला आशा आहे की, या धार्मिक भेदभावात लवकरच बदल होईल, असंही अमाला म्हणाली.

अमाला पॉलने मल्याळम, तेलूगू आणि तमिळ भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलंय