ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याची माहिती बकिंगहॅम पॅलेसने दिलीय. राजघराण्यातील सर्वांनी बकिंगहॅमकडे धाव घेतली आहे. पंतप्रधान लिझ ट्रस यावर चिंता व्यक्त केलीय. गेल्या 70 वर्षांपासून त्या महाराणी आहेत. एलिझाबेथ यांचा जन्म लंडनमध्ये 21 एप्रिल 1926 रोजी झाला. 1947 साली त्यांचा प्रिन्स फिलीप यांच्यासोबत विवाह झाला. 1952 साली त्यांना ब्रिटनची महाराणी म्हणून घोषित केलं. एलिझाबेथ या राष्ट्रकुल परिवाराच्या प्रमुख आहेत.