अॅपलचा इव्हेंट सुरू झाला आहे. कंपनीचे सीईओ टिम कुक हा इव्हेंट होस्ट करत असून त्यांनी Apple Watch Series 8 लॉन्च झाल्याची घोषणा केली आहे.



ही Watch जबरदस्त सेफ्टी आणि हेल्थ फीचर्सने सुसज्ज आहे



सीरीज 8 मध्ये दोन तापमान सेन्सर, ओव्हेलेशन ट्रॅक, इतर फिटनेस आणि आरोग्य केंद्रित फीचर्स देण्यात आले



यातील एक विशेष म्हणजे अपघात झाल्यास ही वॉच आपत्कालीन सेवेशी संपर्क साधू शकते



यासाठी यात क्रॅश डिटेक्शन सेंन्सर देण्यात आले आहे.



Apple Watch Series 8 ला 60 तासांची बॅटरी लाइफ मिळेल



यामध्ये लो पॉवर मोड देखील दिला जात आहे. जो पूर्ण चार्ज केल्यावर 36 तासांची बॅटरी देण्यास सक्षम आहे



Apple Watch Series 8 मिडनाईट स्टारलाइट, सिल्व्हर आणि प्रॉडक्ट रेड कलर पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे



Apple Watch Series 8 मध्ये मोठी स्क्रीन दिली आहे. पण याची डिझाइन बेसिक ठेवण्यात आली आहे



Apple Watch Series 8 च्या GPS व्हर्जनची किंमत 399 डॉलर्स



सेल्युलर व्हर्जनची 499 डॉलर्स पासून सुरू होईल