अभिनेत्री शेफाली जरीवालाने आपल्या मेहनतीच्या जोरावर प्रेक्षकांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले आहे. आजही 'कांटा लगा गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेफालीला आता कोणाच्याही परिचयाची गरज नाही. अर्थात अभिनयाच्या बळावर ती विशेष चमत्कार दाखवू शकली नसली तरी तिने आपल्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता पुन्हा एकदा शेफालीच्या नव्या फोटोशूटमुळे चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. या फोटोंमध्ये शेफालीने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने केस मोकळे सोडले आहेत, आणि न्यूड मेकअप केला आहे. शेफालीच्या फिटनेसनेही सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. वयाच्या 39 व्या वर्षीही तिने स्वतःला तंदुरुस्त ठेवले आहे. (Photo Credit :shefalijariwala/IG)