पुण्यात (pune) वायू प्रदुषणात (air pollution) सातत्याने वाढ होत असल्याचं समोर आलं आहे.



पुण्यातील हवेची खराब श्रेणीत पोचली असन मुंबई, दिल्लीच्या तुलनेत पुण्याची हवा जास्त खराब झाल्याचे पाहायला मिळाले.



हेवेतील अतिसूक्ष्म धुलीकणांचे प्रमाण (पार्टिक्युलेट मॅटर 2.4) अधिक आहे.



वाढलेल्या प्रदूषणामुळे श्‍वसनाचा आजार असलेल्या नागरिकांना आरोग्यासंबंधीचा धोका वाढला आहे.



मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक 146 वर तर पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक 178 वर गेला आहे.



हिवाळ्यात मागील ४ वर्षात मुंबईतील हवा गुणवत्ता दिल्लीपेक्षा वाईट स्थिती जात असल्याचा अनेक संस्थांचा अभ्यास आहे.



मुंबई आणि पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक सामान्य स्थिती असला तरीही मागील काही दिवसात हवेची गुणवत्ता प्रचंड खालवल्याचं चित्र सध्या दिसत आहे.



तापमानात घट झाल्यावर प्रदूषणात ही वाढ नोंदवली जाते.



या प्रदूषित हवेसाठी वाहतूक देखील कारणीभूत आहे.



शहरात रोज हजारो लोक आपल्या स्वत:च्या वाहनाने प्रवास करतात. त्यामुळे हवेतील वातावरणात प्रचंड प्रमाणात धुलीकण पसरतात.