जगात ज्यू धर्मीयांची संख्या फार कमी आहे. पण त्यांचा इतिहास फार जुना आहे. या धर्माची सुरुवात पैगंबर अब्राहम यांनी केली होती. पैगंबर अब्राहम यांना ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मातही महत्त्व आहे. या धर्माची सुरुवात यरुस्लेम पासून झाल्याचं बोललं जातं. यरुस्लेम हे ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मीयांसाठीही पवित्र स्थान आहे. ज्यू धर्म जवळपास 3000 वर्ष जुना आहे. या धर्माचे लोक इस्रायलमध्ये राहतात. ते त्यांच्या धर्मातील मान्यतांचं पालन सक्तीने करतात. या धर्मातील लोक प्रगत असल्याचं म्हटलं जातं.