सध्या सर्व शहरांमध्ये वायू प्रदूषणाची पातळी वाढली आहे.

वाहनांमध्ये झालेली लक्षणीय वाढ यामुळे प्रदूषणही वाढले आहे.

वायू प्रदूषणाचा थेट परिणाम केसांवर देखील होतो.

त्यामुळे केस कोरडे होऊ लागतात आणि त्यांची चमकही कमी होऊ लागते.

अशास्थितीत केसांची काळजी घेणे फार महत्वाचे आहे.

तेल
प्रदूषणापासून केसांचे संरक्षण करण्यासाठी केसांना आठवड्यातून एकदा तेलाने मसाज करा.

असे केल्याने केस मुळापासून मजबूत होतील.

शैम्पूची योग्य निवड
प्रदूषणामुळे केस गळतीच्या समस्या निर्माण होतोत, ही समस्या टाळण्यासाठी सल्फेट फ्री शॅम्पू निवडा.

हायड्रेटेड रहा
प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी केसांना हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे.दिवसातून ७ ते ८ ग्लास पाणी प्या.

असे केल्याने केसांचा कोरडेपणा कमी होईल

निरोगी आहार
केसांना आतून मजबूत ठेवण्यासाठी आरोग्यदायी आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे.

आहारात संपूर्ण धान्यांसह काजू, हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश जरूर करा.

टीप : या सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने.