सिने निर्माता करण जोहरचा 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमाचा सातवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो करणने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे करणचे चाहते आता या कार्यक्रमाची प्रतीक्षा करत आहेत. 'कॉफी विथ करण' हा छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय कार्यक्रम आहे. पण आता या कार्यक्रमाचे नवे पर्व प्रेक्षकांना प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. 7 जुलैपासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारवर हा कार्यक्रम सुरू होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना घरबसल्या कॉफीचा आस्वाद घेत 'कॉफी विथ करण'चा सातवा सीझन पाहायला मिळणार आहे. करणने शेअर केलेल्या प्रोमो व्हिडीओवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 'कॉफी विथ करण'च्या सातव्या सीझनचे पहिल्या भागात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे.