आयपीएलच्या 45 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने अखेर पर्यंत झुंज देऊनही लखनौ सुपरजायंट्सने 6 धावांनी विजय मिळवला. सामन्यात राहुलने 51 चेंडूत 77 धावांची दमदार खेळी केली. त्याला दीपक हुडाने 52 धावांची महत्त्वपूर्ण साथ दिली. दिल्ली संघाला मात्र हे आव्हान पार करता आलं नाही. 196 धावांचे एक मोठे आव्हान दिल्लीसमोर असल्याने त्यांच्यावर आधीच दबाव होता. त्यामुळे त्यांची सुरुवात खराब झाली. त्यांचे दोन्ही सलामीवीर 13 धावांवर बाद झाले. दिल्लीकडून गोलंदाजांनीही खास कामगिरी केली नाही. केवळ शार्दूलने 3 विकेट्स घेतल्या. दिल्लीच्या 196 धावांचा पाठलाग करताना मार्श-पंतने एक चांगली भागिदारी केली. कर्णधार पंत एकहाती झुंज देत होता, ज्यामुळे दिल्ली जिंकेल असे वाटत होते. पण पंतही 44 धावा करुन तंबूत परतला. ज्यामुळे संघाची अडचण वाढली अखेर अष्टैपूल रोवमेन पोवेलने धडाकेबाज कामगिरी सुरु केली. पण 35 धावा करुन तो बाद झाला आणि दिल्लीचा विजय फारच अवघड झाला. अखेरच्या षटकात स्टॉयनिसने मात्र 21 धावा डिफेन्ड केल्या, ज्यामुळे लखनौचा संघ सहा धावांनी जिंकला.