प्रियांका चोप्रा ही सध्या तिच्या 'सिटाडेल' या आगामी सीरिजचे प्रमोशन करत आहे.
प्रियांका तिच्या हॉलिवूड प्रोजक्ट्समुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.
सिटाडेल सीरिजमध्ये प्रियांका ही खतरनाक स्टंट सीन्स करताना दिसणार आहे, ज्याची झलक या सीरिजच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली आहे.
प्रियांका चोप्राने सांगितले की, सीरिजमधील अनेक स्टंट तिने स्वतः केले आहेत.
एका मुलाखतीदरम्यान प्रियंकाने सिटाडेल या वेब सीरिजमधील तिच्या अॅक्शन सीन्सबद्दल सांगितले.
' सिटाडेल या वेब सीरिजमधील जवळपास 80 टक्के स्टंट मी स्वतः केले आहेत, कारण मला माझ्या शरीरावर आणि माझ्या ज्ञानावर माझा विश्वास होता, पण मी खूप काही शिकले आहे.' असं प्रियांकानं सांगितलं.
प्रियांकाच्या आगामी चित्रपटांची तिचे चाहते उत्सुकतेने वाट बघतात.
प्रियांका ही ‘जी ले जरा’या चित्रपटामधून देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
प्रियांकाचा चाहता वर्ग मोठा आहे.
प्रियांकाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक वाट बघत आहेत.