प्रियांका चोप्रा आणि रिचर्ड मॅडन यांच्या 'सिटाडेल' या सीरिजचा ग्रँड प्रीमियर लंडनमध्ये पार पडला. 'सिटाडेल' या सीरिजच्या इंडियन व्हर्जनमध्ये समंथा आणि वरुण धवन हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 'सिटाडेल' या सीरिजच्या प्रीमियरला समंथा आणि वरुण यांनी हजेरी लावली. 'सिटाडेल' या सीरिजच्या प्रीमियरसाठी समंथा आणि वरुण यांनी खास लूक केला होता. समंथा आणि वरुण हे ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसत होते. समंथानं ब्लॅक आऊट फिट आणि सिल्वर ज्वेलरी असा लूक केला होता. समंथानं शेअर केलेल्या या लूकच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. 'सिटाडेल' या सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. समंथाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने बघत आहे. ‘सिटाडेल’ मध्ये समंथा आणि वरुण यांच्या जोडीला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.