सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे रातोरात प्रसिद्ध झालेल्या प्रिया प्रकाशला वेगळ्या ओळखीची गरज नाही.
चाहत्यांमध्ये तिची एक वेगळी ओळख आहे. मात्र, आता ती ज्या लूकमध्ये सोशल मीडियावर दिसलीये ते पाहून चाहतेही हैराण झाले आहेत.
नाकात नथ, केसांचा आंबाडा, हातात बाजूबंद आणि पायात अल्ता... त्यावर आदिवासी शैलीत नेसलेली साडी. प्रिया प्रकाश वारियरचा हा लूक लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
या फोटोंमध्ये ती ना हसत आहे, ना आनंदी आहे... या फोटोत तिच्या चेहऱ्यावरचा भाव अगदी एखाद्या मूर्तीसारखा आहे.
त्यामुळेच प्रिया प्रकाशचे हे लेटेस्ट फोटोशूट खूप चर्चेत आहे. तिने हा लूक का केलाय, हे जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता आहे.
फोटो पाहता असे वाटते की, तिचा लूक एका नवीन प्रोजेक्टसाठी आहे, जो तिने इन्स्टाग्रामवर शेअर करताच व्हायरल झाला आहे.