नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते मराठीसोबतच प्रियाने काही हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस.’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटांतून प्रियाने छोट्या भूमिका साकारल्या होत्या. मराठीतील ग्लॅमरस नायिकांपैकी एक प्रियाच्या अभिनयाचेही नेहमी कौतुक झाले आहे. मराठी चित्रपटसृष्टीमधील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी प्रिया आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.. प्रियाने नुकतेच काही खास फोटो सोशल मिडियावर शेअर केलेत. या फोटोमध्ये प्रियाने क्लासि गुलाबी रंगाच्या ड्रेसमधले फोटो शेअर केलेत. (photo:priyabapat/ig)