प्रार्थना बेहेरेनं अनेक हिंदी-मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. एकता कपूरची 'पवित्र रिश्ता' ही प्रार्थनाची पहिली हिंदी मालिका. 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या माध्यमातून प्रार्थना घराघरांत पोहोचली. तिने 'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही' अशा लोकप्रिय सिनेमांत काम केलं आहे. 'पवित्र रिश्ता', 'क्राईम पेट्रोल', 'लव्ह लग्न लोचा' या मालिकांध्ये प्रार्थनाने काम केलं आहे. सध्या 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून प्रार्थना प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रार्थना नोव्हेंबर 2017 मध्ये अभिषेक जावकरसोबत लग्नबंधनात अडकली आहे. प्रार्थनाला श्रेयस तळपदे सोबत सिनेमात काम करण्याची इच्छा आहे. प्रार्थना सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील यश-नेहाची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.