अभिनेत्री सारा अली खान सध्या बॉलीवुडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा विविध चित्रपटात झळकली आहे. सारा तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. आता तिचे काही नवे फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये ती डेनिम शॉर्ट आणि सिंपल व्हाईट टी-शर्टमध्ये दिसत आहे. तिच्या या फोटोंवर चाहते कमेंट्ल आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. सारा नुकतीच क्रिकेटर शुभमन गिलसोबत एका हॉटेलमध्ये दिसून आली. दोघांचे हे फोटो व्हायरल झाले असून दोघांच्या रिलेशनची चर्चांही रंगली आहे. सारा सोशल मीडियावरही चांगलीच अॅक्टिव्ह असते. त्यामुळे तिच्या फोटो आणि व्हिडीओंना चाहत्यांचाही भरपूर प्रतिसाद असतो.