‘बिग बॉस 12’मधून चर्चेत आलेली अभिनेत्री सृष्टी रोडे हे टीव्ही विश्वातील एक प्रसिद्ध नाव आहे. बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी त्याने अनेक टीव्ही शो आणि जाहिरातींमध्ये काम केले आहे. सृष्टीचे वडील आधीपासूनच टीव्ही इंडस्ट्रीशी संबंधित असल्याने तिला अभिनयाचं बाळकडू घरातूनच मिळालं होतं. बालाजी टेलिफिल्म्सच्या 'कुछ इस तरहा' या शोमधून सृष्टीने टीव्ही मालिका विश्वात प्रवेश केला होता. यात तिची खूप छोटी भूमिका होती. यानंतर सृष्टीने अनेक जाहिरातींमध्येही काम केले आहे, यानंतर ती एक चर्चित चेहरा बनली. 'ये इश्क ही' या शोमध्ये सृष्टीने ‘मंजिरी चतुर्वेदी’ची भूमिका साकारली होती. या भूमिकेने तिला एक वेगळी ओळख मिळवून दिली होती. सृष्टीने ‘छोटी बहु’ या मालिकेत ही महत्त्वाची भूमिका साकारली होती. मालिका विश्वात यश मिळाल्यानंतर सृष्टी रोडेने आपल्या करिअरमध्ये कधीच मागे वळून पाहिले नाही. 'शू...कोई है', 'बैरी पिया', 'छोटी बहू', 'पुनर्विवाह' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये ती झळकली आहे.