भारती सिंह-हर्ष लिंबाचिया डिसेंबर 2017मध्ये विवाहबद्ध झाले होते.
नुकताच दोघांना एक मुलगाही झाला आहे. दोघांचे प्रेग्नेंसी फोटोशूटही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
भारती सिंहने 3 एप्रिल रोजी मुलाला जन्म दिला आहे. छोट्या पाहुण्याच्या आगमनाने भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया खूश झाले आहेत.
भारती आणि हर्ष यांनी सांगितले की, त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव 'लक्ष्य' ठेवले आहे आणि त्यांनी हे नाव निवडले कारण की, त्यांचा मुलगा कधीही त्याच्या ध्येयापासून विचलित होऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे.